भिडे गुरुजींच्या अडचणीत वाढ, न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

नाशिक : आंबे खाल्याने मुलं होत असल्याचे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे उर्फ भिडे गुरुजी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. भिडे यांना येत्या 31 ऑगस्ट रोजी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर होण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने बजावले आहेत.नाशिकमध्ये गेल्या 10 जून रोजी त्यांची सभा झाली होती.

संभाजी भिडेंना अटक करा ; रामदास आठवले काढणार मोर्चा

नाशिक महापालिकेने याप्रकरणी भिडे गुरुजी यांच्याविरोधात खटला दाखल केला असून, त्यावर आज सुनावणी झाली.संभाजी भिडे यांच्याविरोधात महापालिकेने जिल्हा न्यायालयात खटला दाखल केल्यानंतर त्यासंदर्भात आधी (दि.7) रोजी सुनावणी झाली होती, तर आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी ॲड. सुवर्णा शेफाल यांनी युक्तिवाद केला असता, तो ऐकून घेतल्यानंतर न्या.जयदीप पांडे यांनी संभाजी भिडे यांना येत्या 31 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

बाष्कळ विदर्भाला वेगळे राज्य हवंय, पण ते वढू रायगडाला मान्य नाही – भिडे गुरुजी

ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान… नही सहेंगे संतो का अपमान – आमदार प्रकाश गजभिये