Breaking : राज्यातील लॉकडाऊन आता ‘या’ तारखेपर्यंत वाढवणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

Breaking : राज्यातील लॉकडाऊन आता ‘या’ तारखेपर्यंत वाढवणार; आरोग्यमंत्र्यांचे संकेत

rajesh tope

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासन अनेक उपाययोजना राबवत आहे. राज्यात लॉकडाऊन करण्यात आला असून आता जिल्हा पातळीवर पूर्ण लॉकडाऊन करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

राज्यात काल नव्या कोरोना बाधितांचा आकडा ४० हजार ९५६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या एकूण रुग्ण संख्येत काहीशी घट पाहायला मिळत असली तरी धोका अजून कायम आहे. तर, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी लॉकडाऊनबाबत भाष्य करताना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत वा काही सूट देण्याबाबत चर्चा करून एकमताने निर्णय होण्याची शक्यता असल्याचं भाष्य केलं होतं

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सध्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधून बैठकीतील चर्चेबाबत माहिती दिली आहे. ‘सात लाखांवरील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आता चार लाखांवर आली आहे. तरीदेखील स्थिती आटोक्यात येण्यासाठी लॉकडाऊन आणखी पंधरा दिवस वाढवावा अशी चर्चा झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णयजाहीर करतील. मात्र, एक सूतोवाच मी देत आहे.’ असं म्हणत लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवला जाऊ शकतो असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या