राम मंदिर प्रश्नावरून दिगंबर आखाडा भाजपविरोधात आंदोलन उभारण्याच्या तयारीत

टीम महाराष्ट्र देशा- आयोध्येतील दिगंबर आखाड्याचे महंत सुरेश दास यांनी थेट भाजपला राम मंदिराच्या प्रश्नावरून घेरलं आहे. २०१९ साली पुन्हा भाजपला सत्तेत यायचं असेल तर भाजपला राम मंदिर उभारावेच लागेल असा इशारा महंतांनी दिला आहे. जर भाजपने राम मंदिर उभारण्याच्या दिशेने भाजपने वाटचाल केली नाही तर भाजपच्या विरोधात आंदोलन उभा करण्याची तयारी दिगंबर आखाड्याने सुरु केली आहे.

नुकतेच केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी २०१९ साली होणाऱ्या निवणुकीत विकास हा एकमेव मुद्दा असेल असं स्पष्ट केलं आहे. नकवी यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार महंत सुरेश दास यांनी घेतला. भाजपला राम मंदिर उभारावेच लागेल जर राम मंदिर उभारण्याच्या प्रश्नाला भाजपने बगल दिली तर परिणाम भोगण्यासाठी भाजपने तयार राहावे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.