कुमारस्वामींच्या 5 वर्षांच्या समर्थनाचा निर्णय आताच घेता येणार नाही : कॉंग्रेस

blank

बंगळुरू- अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेणाऱ्या कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांची बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली आहे. मात्र कॉंग्रेसने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. काँग्रेसनं कुमारस्वामींच्या 5 वर्षांच्या समर्थनाचा निर्णय आताच घेता येणार नाही, असं म्हटलं आहे. काँग्रेस-जेडीएस आघाडीचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या या विधानामुळे कुमारस्वामी 5 वर्षं मुख्यमंत्री राहतील की नाही, याबाबत शंका उपस्थित झाली आहे.

नेमकं काय म्हणाले जी. परमेश्वर ?
कुमारस्वामी 5 वर्षं मुख्यमंत्री राहतील की या 5 वर्षांत आमचा कोणी मुख्यमंत्री होईल, याबाबत अद्याप निर्णय होणं बाकी आहे. आम्ही त्यांच्या रुपरेषेवर अद्याप चर्चा केलेली नाही. यावर अद्याप निर्णय येणं बाकी आहे. कोणती खाती आम्हाला मिळणार आहेत आणि कोणती खाती ते स्वतःकडे ठेवणार आहेत, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. तसेच पाच वर्षं तेच मुख्यमंत्री राहतील की मुख्यमंत्रिपद आम्हालाही मिळेल, याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नाही. जेडीएसबरोबरच्या चर्चेनंतर काँग्रेसला किती फायदा आणि नुकसान होतंय, याचा विचार करून आम्ही निर्णय घेऊ.