पद्मावत मधील अलाउद्दीन खिलजीचं पात्र पाहून आझम खान यांची आठवण झाली- जयाप्रदा

टीम महाराष्ट्र देशा- ‘ पद्मावत सिनेमा पाहत असताना त्यामधील खिलजीचे पात्र पाहून मला आझम खान यांची आठवण झाली. मी निवडणूक लढवत असताना त्यांनी मला असाच त्रास दिला होता’ या शब्दात माजी खासदार जयाप्रदा यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जयाप्रदाचे सहकारी अमरसिंह यांनीही काही दिवसांपूर्वी आझम खान यांची तुलना खिलजीशी आणि जयाप्रदा यांची तुलना राणी पद्मावतीशी केली होती.

आझम खान वि. अमर सिंह-जयाप्रदा यांच्यामधील वाद हा जुनाच आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप करण्याची संधी शोधत असता. यापूर्वी ‘आम्ही नाचणाऱ्या बाईलाही खासदार बनवतो’ असे वादग्रस्त वक्तव्य आझम खान यांनी केले होते. तर ‘आझम खान यांच्या दादागिरीमुळेच मला रामपूर मतदारसंघापासून दूर रहावे लागते’ असा आरोप जयाप्रदा यांनी केला होता. यावेळी देखील जयाप्रदा यांनी आझम खान यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

You might also like
Comments
Loading...