IND vs WI : शमीला डच्चू, भूवी-बुमराहचे वन डे संघात ‘कमबॅक’

टीम महाराष्ट्र देशा- विंडीजविरुद्धच्या उर्वरित तीन सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार या वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. रोटेशन योजनेप्रमाणे या तीन सामान्यांसाठी पृथ्वी शॉ ला संधी मिळेल, अशी चर्चा क्रिकेटवर्तुळात होती. मात्र या मालिकेत त्याला संधी मिळू शकलेली नाही.

Loading...

आशिया क्रिकेट स्पर्धेनंतर बुमरा आणि भुवनेश्वर यांना विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी या दोघांना विश्रांती देण्यात आली होती. आगामी तीन सामन्यांसाठी मोहम्मद शमीला संघात स्थान देण्यात आलेले नाही.

उर्वरित ३ एकदिवसीय सामन्यांसाठी भारताचा संघ – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेन्द्र चहल, कुलदीप यादव, खलील अहमद, उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारLoading…


Loading…

Loading...