fbpx

Breaking : जम्मू बस स्थानकावर स्फोट, १८ जखमी

टीम महाराष्ट्र देशा – पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमधील वातावरण तणावपूर्ण असतानाच काश्मीरमध्ये ग्रेनेड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. जम्मूतील बस स्टॅंडवर हा हल्ला झाला असून यातील १८ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी परिसर पूर्णपणे सील केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही स्फोट झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान १४ फेब्रुवारी रोजी जैश – ए – मोहम्मद या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. स्फोटकांनी भरलेली चार चाकी सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर धडकावली. यामध्ये ४० हून अधिक जवान शाहिद झाले होते .