fbpx

वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळा उभारणीचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होणार

टीम महाराष्ट्र देशा- गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळा उभारणीचे काम २५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल, असे निवेदन सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात आले. मात्र आता अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक कधी होणार असा सवाल शिवप्रेमी विचारू लागले आहेत.हे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८२ मीटर उंच असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन सरदार पटेल यांच्या जयंती दिवशी म्हणजेच ३१ ऑक्टोबर रोजी करण्याची घोषणा राज्य सरकारने यापूर्वीच केली आहे. मुख्यमंत्री विजय रूपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी हा पुतळा उभारणीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच भेट दिली.

केरळमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड