भाजपची डोकेदुखी वाढली, एक-दोन नव्हे तब्बल तेवीस आमदार नाराज

bjp flag

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा देशभर कॉंग्रेसविरोधात रान पेटवत असताना गुजरात भाजपामध्ये सारं काही आलबेल नसल्याचं चित्र समोर आलं आहे. गुजरातमधील सरकारी बाबूंच्या मुजोरीचा मुद्दा उचलत, भाजपाच्या तीन आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. बंडखोर आमदार मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या कार्यशैलीवर नारज असल्याचं बोललं जात आहे.

गुजरात सरकारविरोधी वातावरण असतानाही, गेल्या वर्षीच्या निवडणुकीत सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजपने निसटता का होईना पण विजय मिळवला . मात्र काही महिन्यातच पक्षांतर्गत नाराजी आणि सरकारी बाबूंची मुजोरी यामुळे भाजपची डोकेदुखी वाढू लागली आहे. भाजपाच्या तीन आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला असून आपणच नाही, तर 20 आमदार भाजपावर नाराज असल्याचा दावा या त्रिकुटाने केला आहे.

Loading...

आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि त्यांना उत्तरदायी आहोत. परंतु, गुजरातमधील सरकारी अधिकारी आमचं म्हणणं ऐकतच नाहीत, अशी तक्रार आमदार मधु श्रीवास्तव, केतन इनामदार आणि योगेश पटेल यांनी केली आहे. हे प्रकरण थेट दिल्ली दरबारी घेऊन जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. परंतु, सरकारी बाबूंच्या खांद्यावर बंदुक ठेवून हे आमदार मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करत असल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

लेख : जमिनीवरच्या राजना मनसे शुभेच्छा!

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
कोरोनाविरोधात लढण्यासाठी रिलायंस कंपनीने घेतला 'मोठा' निर्णय; केली तब्बल 'इतक्या' कोटींची मदत
#Corona : कनिका कपूरचा चौथा रिपोर्टही पॉझिटीव्ह, इंस्टा अकाऊंटवरून केली भावनिक पोस्ट
दारुड्यांसाठी अत्यंत वाईट बातमी...दुकाने सुरु होण्यासाठी पहावी लागणार आणखी वाट
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
कोरोना ( कोव्हिड-१९ ) संसर्गाची भिती कोणाला ?
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?