fbpx

वरवरा राव नक्षलवाद्यांचे मार्गदर्शक,नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरच्या दाव्याने खळबळ

टीम महाराष्ट्र देशा- नक्षल चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून काही दिवसांपासून नजरकैदेत असलेले लेखक आणि कवी वरवरा राव यांनी नक्षलवादी चळवळींना मार्गदर्शनही केले केले असल्याचा खळबळजनक दावा नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कमांडरने केला आहे. वेट्टी रामा असं या कमांडर चे नाव असून राव यांचा शहरी नेटवर्क सांभाळण्यामध्ये महत्वाचा सहभाग होता, असे तपास अधिकाऱ्यांना सांगितल्याचे वृत्त आहे.

टाईम्स नाऊने या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, वरवरा राव आणि काही पत्रकारांसारख्या लोकांनी पुढे येत शहरी नेटवर्कसाठी मदत केल्याचे रामाने सांगितले. वरवरा राव यांनी चकमकींमध्ये मारल्या जाणाऱ्या कॉम्रेड यांच्या मृतदेहांना बाहेर काढण्यासाठी मोठी मदत केली. या काळात त्यांनी नक्षलवादी चळवळींना मार्गदर्शनही केले. आम्ही संघटनेच्या मजबुतीसाठी आणि सदस्यांसाठी काम केले. मात्र, वरवरा राव यांची अटक आणि अन्य वरिष्ठ नेत्यांच्या प्रत्यार्पणामुळे संघटना कमकुवत बनत चालली असल्याचेही रामा याने सांगितले.