गौतम गंभीरचा रेकॉर्ड मोडत सूर्यकुमार ‘या’ यादीत अव्वल स्थानी

surya

श्रीलंका : एकदिवसीय मालिकेतील विजयानंतर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा ३८ धावांनी पराभव केला आहे. भारताने दिलेल्या १६५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संपुर्ण संघ १२६ धावांवर अटोपला. यासह भारताने तीन टी-२० सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकत श्रीलंकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले. सामन्यातील पहिल्याच चेंडुवर पदार्पणवीर पृथ्वी शॉ शून्यावर बाद झाला. यानंतर मधल्या फळीतील इतर फलंदाजानी केलेल्या फलंदाजीमुळे भारताने निर्धारीत २० षटकात ५ गडी गमावत १६४ धावांची मजल मारली. भारताकडून सुर्यकुमार यादवने ३४ चेंडुत ५ चौकार आणि २ षटकारासंह सर्वाधीक ५० धावांची अर्धशतकी खेळी केली.

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत भारतासाठी चार टी -20 सामने खेळले आहेत आणि तीन डावात त्याने 46.33 च्या सरासरीने 139 धावा केल्या आहेत. त्याची आतापर्यंतची सर्वोत्तम धावसंख्या 57 धावा आहे. सूर्यकुमारने आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीतील पहिल्या तीन डावांमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने पहिल्या तीन डावात 109 धावा केल्या गौतम गंभीरला मागे टाकले आहे.

महत्त्वाच्या बातम्या