ब्रेकिंग : देवेंद्र फडणविसांनी मुख्यमंत्रीपदाचा राज्यपालांकडे दिला राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालाच्या भेटीला गेले होते .ते राज्यभवनावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. भगतसिंह कोश्यारी यांच्या कडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. थोड्या वेळाने ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यामध्ये निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. आज विद्यमान सभागृह बरखास्त होणार असल्याने राज्यात नेमकं काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वाधिक जागा मिळालेल्या भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावर रस्सीखेच सुरु आहे.

लोकसभा निवडणुकीत जे ठरलं तेवढचं मिळाव, शेवटपर्यंत युती टिकवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आता भाजपने काय तो निर्णय घ्यावा, असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीमध्ये केल होत . त्यामुळे आजही शिवसेना मुख्यमंत्री पदावर ठाम असल्याचं स्पष्ट झाल आहे.