सरकारला ओपन चॅलेंज करत भाजप आमदाराचा खून करण्याची धमकी

औरंगाबाद : सरकारला ओपन चॅलेंज करत भाजप आमदाराचा खून करण्याची धमकी देण्यात आली आहे. औरंगाबादचे भाजप आमदार अतुल सावे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. फेसबुकच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली  आहे.

‘‘मी एका बीजेपी आमदाराचा खून करणार आहे, फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. ते फक्त विशिष्ट समाजाला प्रोटेक्शन देत आहेत. थांबवू शकत असाल तर थांबवा, अशी धमकी एका फेसबुकवरून यांना देण्यात आली आहे.

धमकी देणारा व्यक्ती युवक काँग्रेसचा माजी जिल्हाध्यक्ष असल्याचं सांगण्यात येतंय. पंतप्रधान मोदीबाबत सुद्धा अपशब्द लिहण्यात आले आहेत. या धमकी बाबत जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे.

You might also like
Comments
Loading...