ब्रेकिंग : महाविकासआघाडीच्या संयुक्त बैठकीला सुरवात, सत्ता स्थापनेच्या दाव्यावर चर्चा

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार येणार असल्याचं जवळपास निश्चित झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई येथे आता महाविकासआघाडीची संयुक्त बैठक सुरु झाली आहे. या बैठकीत सत्ता स्थापनेचा दावा कधी करायचा याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार आणि कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार यावरही चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुंबईतील नेहरु सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ‘महा’बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादीकडून शरद पवार, जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल तर शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, एकनाथ शिंदे, सुभाष देशाई दाखल झाले आहेत. काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, अहमद पटेल, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नसीम खान उपस्थित आहेत.

दरम्यान राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या महाविकासआघाडीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक चर्चा बैठकांनंतर तीनही पक्षांचे सत्ता स्थापनेच्या मुद्यांवर एकमत झाले आहे. शिवसेनेला सर्वाधिक मतं असल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री असेल असा फॉर्म्युला फायनल झाला असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या