fbpx

Breaking : काँग्रेस- राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा सुटला,जाणून घ्या कोण किती जागा लढविणार

नवी दिल्ली : काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागावाटपावरून सुरु असलेला मुद्दा अखेर मार्गी लागला आहे. दोन्ही पक्ष आता प्रत्येकी २४-२४ जागा लढविणार आहेत.काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनाही माहिती दिलीआहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात बुधवारी झालेल्या चर्चेमध्ये हा निर्णय झााला.

काँग्रेस स्वत: २६ जागा लढवू इच्छित होती आणि राष्ट्रवादीला २२ जागा देण्याचीच त्या पक्षाची तयारी होती अशी देखील माहिती समोर आली आहे . मात्र बलाढ्य भाजपला रोखताना एक दोन जागेवरून आघाडीत बिघाडी होऊ नये म्हणून ५०-५० चा फॉर्म्युला मान्य करण्यात आल्याचं देखील बोललं जात आहे.