गुजरातमध्ये काँग्रेसला धक्का;शेतकरी सेलच्या नेत्याची पत्नीसह आत्महत्या

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

अहमदाबाद : गुजरातमध्ये विधानसभेची सध्या रणधुमाळी सुरु असून सत्ताधारी भाजपला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून कॉंग्रेसकडून घेरण्यात येत आहे मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपवर निशाना साधणाऱ्या  काँग्रसेसाठी एक वाईट बातमी आली आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधीच राजकोटमधील काँग्रेस नेते हरेश मोराडिया आणि त्यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समोर येत आहे.हरेश मोराडिया हे काँग्रेसच्या शेतकरी सेलचे नेते होते.दोघांनी आत्महत्या का केली याबाबत अजून कोणतही ठोस कारण अथवा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

You might also like
Comments
Loading...