मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांचा महापूजेला न जाण्याचा निर्णय

सोलापूर : मराठा समाजाच्या भावना लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. पंढरपुरात दरवर्षी आषाढीला राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा होते. मात्र यासाठी मराठा समाजाचा विरोध होता.

दरम्यान, जे वारकरी पंढरपुरात येतात, त्यांची यात काहीही चूक नाही. जेणेकरुन कोणताही अनुचित प्रकार घडून त्यांना त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली

मराठा आरक्षण : संतप्त आंदोलकांनी सहकार मंत्र्याची गाडी अडवली