अति घाई थेंबा थेंबात जाई; पुणे महापालिकेत सर्वपक्षीय ‘छत्री’ आंदोलन

पुणे : पुणे महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीचे उदघाटन मागील आठवड्यात करण्यात आले. मात्र, उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच नवीन सभागृहाला गळती लागली, त्यामुळे इमारतीचे काम अपूर्ण असतानाही उदघाटनाचा घाट घालण्यात आल्याच उघड झालं. आता याच मुद्यावरून विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.

इमारतीचे बांधकाम अपूर्ण असतानाही उद्घाटनाची घाई करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध म्हणत पुणे महापालिका सभागृहात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेकडून छत्री आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर सभागृहातच ‘ये रे ये रे पाऊसा’ गाणे वाजवत निषेध व्यक्त करण्यात आला.

सर्वसामान्य नागरिकांना प्लास्टिक बंदीचा दंड कराल, तर गाठ ‘मनसेशी ’

You might also like
Comments
Loading...