fbpx

‘तिहेरी तलाक’ दिल्यास शिक्षा, अध्यादेशाला मंत्रिमंडळाची मंजुरी!

टीम महाराष्ट्र देशा- मुस्लिम महिलांच्या जीवनात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी अखेर ‘तिहेरी तलाक’चा अध्यादेश तयार करण्यात आला असून त्याला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची सूत्रांची माहिती आहे. खासगी वृत्तवाहिनीने यासंदर्भात सूत्रांच्या हवाल्याने माहिती प्रसिद्ध केली आहे. या अध्यादेशानंतर तिहेरी तलाक देणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरणार आहे.

हा अध्यादेश ६ महिने लागू असेल. दरम्यानच्या काळात हा अध्यादेश संसदेत मंजूर करुन घ्यावा लागले. सरकारजवळ विधेयक मंजूर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनापर्यंतचा कालावधी आहे.तीन तलाक विधेयकाला लोकसभेत मंजूरी मिळाल्यानंतर राज्यसभेत अडकले होत.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या अध्यादेप्रमाणे तीन तलाक दिल्यास तीन वर्षांची सजा होऊ शकते. याशिवाय महिलांना पोटगी आणि मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूदही करण्यात आली आहे. फोनवरुन, लिहून किंवा बोलून कोणत्याही प्रकारे तीन तलाक देणे बेकायदेशीर मानले आहे.

मुस्लीम समाजाने मोदी सरकारचे आभार मानावे- शायरा बानो

तिहेरी तलाकविरोधात रान पेटवणाऱ्या इशरत जहाँचा भाजपमध्ये प्रवेश

राजकीय पक्षांनी तिहेरी तलाकवर राजकारण करू नये :शायरा बानो