केंद्र सरकारचा अजब निर्णय : रमजानच्या काळात दहशतवादाविरोधात कारवाई नाही

टीम महाराष्ट्र देशा- एका बाजूला दहशतवादाला धर्म नसतो असं म्हणायचं आणि वागायचं उलटंच हे राजकीय पक्षाचं समीकरण वारंवार समोर आलं आहे. आता रमजानच्या काळात दहशतवादाविरोधात कारवाई करणार नसल्याचा अजब निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे रमजानवेळी काश्मीरमध्ये आतिरेक्यांविरोधात कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. रमजानच्या महिन्यात दहशातवादाविरोधात कोणतीही शोधमोहिम न करण्याचा आदेश आज केंद्र सरकारने दिला आहे.

रमजानच्या महिन्यामध्ये दहशतवाद्याविरोधात कोणतेही ऑपरेशन लॉन्च न करणयाचे आदेश केंद्र सरकारने सुरक्षा दलाला आदेश दिले आहेत. पण जर समोरुन दहशतवाद्यांकडून कारवाई झाली तर निर्दोष लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रतिहल्ला करण्याचा सुट भारतीय जवानांना देण्यात आली आहे. सर्वसामान्य लोकांसाठी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्राकडे ही मागणी केली होती.

You might also like
Comments
Loading...