नाना पटोलेंचा भाजप खासदार पदाचा राजीनामा

Nana-Patole

टीम महाराष्ट्र देशा – भाजप बंडखोर खासदार नाना पटोले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. पटोले हे भंडारा- गोंदियाचे भाजप खासदार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी समस्यांवर आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावरून नाना पटोले हे स्वपक्ष भाजपवर टीका करत असल्याने प्रकाश झोतात आले. चार दिवसांपूर्वी कापूस प्रश्नी पटोले आणि भाजपचे जेष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी मोठे शेतकरी आंदोलन उभारत सरकारची कोंडी केली होती.

Loading...

दरम्यान राजीनामा दिल्यानंतर दुपारी ते पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत.Loading…


Loading…

Loading...