Breaking : पंढरपूर फेर पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा खुलासा !

पंढरपूर : अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे कमळ पंढरीत फुलले आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडेंनी 3733 मतांनी बाजी मारली.

दिवंगत भारत भालके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा आवताडेंनी पराभव केला. मतमोजनीत सुरुवातीपासूनच समाधान आवताडे यांनी आघाडी घेतली होती, ती विजयापर्यंत कायम राखली. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल अपेक्षेप्रमाणे अतिशय घासून झाला. अनपेक्षितपणे भाजपने मारलेली मुसंडी राष्ट्रवादीला धक्का देणारी आहे.

दरम्यान आता या पोटनिवडणुकीत साम-दाम-दंड-भेद वापर करण्यात आला. त्यामुळे याची योग्य ती चौकशी करुन फेरनिवडणूक करण्यात यावी, अशी मागणी स्वतःला राष्ट्रवादीचा पदाधिकारी भासवणाऱ्या ऍड. नितीन माने यांनी केली आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

आता या प्रकरणी राष्ट्रवादीकडून खुलासा करण्यात आला आहे. ‘ऍड. नितिन माने नावाच्या व्यक्तीशी राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेलचा काहीही संबंध नाही. त्यांना कोणतेही नियुक्तीपत्र देण्यात आलेले नाही वा त्यांनी दिलेल्या कोणत्याही निवेदनाशी अथवा तक्रारीशी सेलचा दूरान्वयानेही संबंध नाही,’ असे सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड. आशिष देशमुख यांनी जाहीर केले आहे.

‘ऍड. नितीन माने ही व्यक्ती स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलच्या महाराष्ट्र कार्यकारिणीची सदस्य असल्याचे भासवत आहे. या व्यक्तीने तसे लेटरहेड देखील बनवले आहे तसेच या लेटरहेडचा वापर करून, पार्टी लिगल सेलच्या नावाचा गैरवापर करून, खोटी निवेदने व तक्रारी ही व्यक्ती देत आहे. नितिन माने यांच्यावर सेलच्या आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विश्वास ठेवू नये व पत्रव्यवहार करू नये,’ असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लिगल सेलचे प्रदेशाध्यक्ष ऍड. आशिष देशमुख यांनी जाहीर केले आहे.

ऍड. नितीन माने यांनी नेमकी काय मागणी केली होती ?

‘विधानपरिषद विद्यमान आमदार प्रशांत परिचारक आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या कारखान्यावर कार्यरत असणारे सर्व सभासद, कर्मचारी यांना निवडणुकीपूर्वी तीन दिवस डांबून ठेवले होते. तसेच त्यांना धमकी देऊन भाजपला मतदान करा, अन्यथा कामावरुन काढून टाकू, असेही सांगण्यात आले.’ असा धक्कादायक आरोप करत समितीच्या अध्यक्षतेखाली फेरनिवडणूक पारदर्शक पद्धतीने घेण्यात यावी अशी मागणी ऍड. नितीन माने यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या