कोरेगाव भीमा हिंसाचार : एकबोटेंच्या जामिनाला आव्हान

टीम महाराष्ट्र देशा- कोरेगाव भीमा येथे झालेल्या जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणात हिंसाचार करण्यास जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांच्या जामिनाला आव्हान देणारी याचिका एका पीडित व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. याविषयी ५ जूनला सुनावणी होण्याची शक्यता आहे

दरम्यान यापूर्वी कोरेगाव भीमा येथे झालेल्या जाळपोळ आणि तोडफोड प्रकरणात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या न्यायालयाने विविध अटी आणि शर्तींवर जामीन मंजूर केला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणात अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यानंतर त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयाने एप्रिल महिन्यात जामीन मंजूर केला आहे.एकबोटे यांना अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात देखील यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे.

भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी दोन गटात झालेल्या वादातून हिंसाचार झाला होता. हिंसाचारात वाहनांची तोडफोड तसेच वाहने पेटवून देण्यात आली होती. दंगल घडवणे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिलिंद एकबोटे आणि श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

You might also like
Comments
Loading...