बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल ११ तारखेला

बीड : न्यायालयीन प्रक्रियेमुळे 24 मेपासून उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर पडली. याच प्रकरणातील निर्णय आता सोमवारी म्हणजे 11 तारखेला लागणार असल्याचं हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सांगितलं.

विधानपरिषद निवडणुकीच्या ६ पैकी ५ जागांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. मात्र, बीड-उस्मानाबाद-लातूरची मतमोजणीच झाली नाही. कारण, याबाबत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल झाल्या आहेत.कोर्टाचा आदेश न आल्यामुळे या जागेचा निकाल जाहीर न करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता