‘या’ तारखेपर्यंत लागणार बीड-उस्मानाबाद-लातूर विधानपरिषदेचा निकाल

EVM

बीड : विधानपरिषद निवडणुकीच्या ६ पैकी ५ जागांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. मात्र, बीड-उस्मानाबाद-लातूरची मतमोजणीच झाली नाही. कारण, याबाबत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल झाल्या आहेत.कोर्टाचा आदेश न आल्यामुळे या जागेचा निकाल जाहीर न करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. अखेर 11 जूनपर्यंत मतमोजणी करण्याचे आदेश आता देण्यात आले आहेत.

दरम्यान,विधानपरिषद निवडणुकीच्या ६ पैकी ५ जागांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. मात्र लातूर-उस्मानाबाद-बीड जागेची मतमोजणी थांबविण्यात आली होती. परंतु आम्हाला ती मतमोजणी करून घ्यायची आहे. त्यासाठी आम्ही औरंगाबाद न्यायालयात दाद मागितली आहे. वेळ पडल्यास दिल्लीतील निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाकडेही दाद मागणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले होते.