स्त्री- पुरुषांना समान अधिकार, विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरू शकत नाही :सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली : व्याभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. यावेळी लोकशाहीमध्ये स्त्री- पुरुषांना समान अधिकार असून पती हा पत्नीचा मालक नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.

समाजामध्ये महिलांचा सन्मान होणे गरजेच आहे, मुलभूत अधिकरांमध्ये त्यांनाही समान अधिकार मिळायला हवा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाकडून आज देण्यात आलेल्या निर्णयामुळे आता विवाहबाह्य संबंध हा गुन्हा ठरू शकणार नाही. कलम ४९७ हे घटनाबाह्य असल्याने ते रद्द करण्यात येण्याची याचिका इटलीमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकाने केली होती, यावर आज सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला.

काय आहे कलम ४९७

भादंवि कलम ४९७ नुसार एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या पुरूषाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवल्यास त्याला व्यभिचाराचा गुन्हा म्हणत. यामध्ये संबंधित पुरुषाला पाच वर्षे तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होती, मात्र यामध्ये लैंगिक संबंधठेवणाऱ्या स्त्रीला तिला दोषी धरले जात नाही. यात केवळ विवाहित महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे हा व्यभिचार ठरतो.

मुलींना संपत्तीत वाटा मिळावा यासाठीही लढा देणार : शिया वक्फ बोर्ड

ताजमहालाला संरक्षण द्या किंवा उद्ध्वस्त करा, सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले