अमेरिकेने केली भारताला मोठी मदत, रेमडेसिव्हिरच्या १,२५,००० कुप्या भारतात दाखल

modi

नवी दिल्ली- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, दररोज भारतात तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. अशापरिस्थितीत कोरोना रूग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे.

बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो नागरिकांचा जीव देखील जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी दोन हात करणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी जगातील काही देश पुढे सरसावले आहेत.

कोरोना प्रतिबंधासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी अमेरिकेनं देऊ केलेली मदतीचा ओघ सुरु असून काल रेमडेसिव्हिरच्या 1 लाख 25 हजार कुप्या असलेली खेप भारतात पोहोचली. अमेरिकेकडून आलेली ही चौथी खेप असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितलं.

या सहकार्याबद्दल अमेरिकेचे आभार मानत असल्याचं बागची यांनी आपल्या ट्विटर संदेशांत म्हटलं आहे. यापुर्वी 1 हजार ऑक्सिजन सिलेंडर्स, रेग्युलेटर आणि इतर वैद्यकिय उपकरणं घेऊन शनिवारी हवाईमार्गे मदत पोहोचली आहे.

महत्वाच्या बातम्या