९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख

अध्यक्षपदाच्या पंचरंगी लढतीत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर शोभणे यांना केवळ ३५७ मते मिळाली आहेत.

टीम महाराष्ट्र देशा – ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या पंचरंगी लढतीत लक्ष्मीकांत देशमुख यांनी बाजी मारली आहे. कोण होणार संमेलनाध्यक्ष, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागले होते. डॉ. किशोर सानप, डॉ. रवींद्र शोभणे, रवींद्र गुर्जर, लक्ष्मीकांत देशमुख आणि राजन खान हे पाच उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात होते.

Rohan Deshmukh

सनदी अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना देशमुख यांनी ‘सलोमी’, ‘ऑक्टोपस’, ‘अंधेरनगरी’, ‘हरवलेले बालपण’, ‘अग्निपथ’, ‘मृगतृष्णा’ अशा २६ पुस्तकांचे लेखन केले आहे .ज्येष्ठ कादंबरीकार, कथालेखक व निवृत्त सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी साहित्यिक रवींद्र शोभणे यांचा ७० मतांनी पराभव केला. पंचरंगी लढतीत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर शोभणे यांना ३५७ मते मिळाली आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवडून आल्याबद्दल देशमुख यांच्यावर साहित्यक्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...