ऑस्कर: ‘द शेप ऑफ वॉटर’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

the shape of water

टीम महाराष्ट्र देशा- हॉलिवूड विश्वातील अत्यंत मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर ‘द शेप ऑफ वॉटर’ चित्रपटाने मोहर उमटवली आहे. ‘द शेप ऑफ वॉटर’ने सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शन या दोन मुख्य पुरस्कारांसह एकूण चार ऑस्कर मिळवले. आंतरराष्ट्रीय सिनेजगतातील प्रतिष्ठेच्या ९० व्या ‘ऑस्कर’ पुरस्कार सोहळ्याला थाटात सुरुवात झाली आहे. लॉस एंजलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा शानदार सोहळा सुरू आहे. ‘थ्री बिलबोर्ड्स’साठी अभिनेता सॅम रॉकवेलला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘इकारस’ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

Loading...

फ्रान्सेस मॅकडोर्मंड यांना ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर ‘द डार्केस्ट अवर’ चित्रपटातील भूमिकेसाठी गॅरी ओल्डमन यांना सर्वोत्तम अभिनेत्याचा ऑस्कर मिळाला. ‘द शेप ऑफ वॉटर’साठी गिलर्मो डेल टोरो यांनी सर्वोत्तम दिग्दर्शनाची बाहुली पटकावली.

लॉस अँजेलसमध्ये 90 वे ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आले. बहुचर्चित डंकर्क चित्रपटाने सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनिमिश्रण आणि सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन असे तीन ऑस्कर पटकावले.चिली देशाच्या ‘अ फँटॅस्टिक वुमन’ या स्पॅनिश चित्रपटाने सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटाचा मान मिळवला.

अभिनेत्री श्रीदेवी आणि ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना अकॅडमी अवॉर्ड्सतर्फे श्रद्धांजली देण्यात आली. दिवंगत कलाकारांच्या मोंटाजमध्ये श्रीदेवी आणि शशी कपूर यांचे फोटो दाखवून त्यांना मानवंदना देण्यात आली.

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- सॅम रॉकवेल- थ्री बिलबोर्डस् आऊटसाईड एब्बींग, मिसोरी

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा -डार्केस्ट अवर – कझुहिरो, मेलिनोस्की, लकी सिबिक

सर्वोत्कृष्ट वेशभूषा – मार्क ब्रिजेस – फॅन्टम थ्रेड

सर्वोत्कृष्ट फिचर डॉक्युमेन्टरी – इकरस -ब्रायन फोगल, डॅन कोगन यांना पुरस्कार

सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग – डंकर्क – अॅलेक्स गिबसन, रिचर्ड किंग

सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग – डंकर्क – ग्रेग वेइंगार्टन, गॅरी ल‌ॅनडेकर ,मार्क रिझो

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन-सेट डेकोरेशन- द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट फॉरेन लँग्वेज फिल्म – अ फँन्टास्टिक वुमन -चिले

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – अॅलिसन जेनी – आय, टोनया

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट – डियर बास्केटबॉल

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड सिनेमा – कोको

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – ब्लेड रनर २०४९

सर्वोत्कृष्ट संकलन – डंकर्क

सर्वोत्कृष्ट शॉर्ट डॉक्युमेन्टरी – हेवन इज अ ट्रॅफिक जॅम ऑन 405

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म – द सायलेन्ट चाईल्ड

सर्वोत्कृष्ट अॅडाप्टेड स्क्रिनप्ले – जेम्स आयवरी ( कॉल मी बाय युअर नेम)

सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा- जॉर्डन पिल -गेट आऊट

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी- रॉजर डिकिन्स -ब्लेड रनर 2049

सर्वोत्कृष्ट संगीत -अॅलेक्सझॅन्ड्रा डेस्प्लेट

सर्वोत्कृष्ट गीत – रिमेम्बर मी -कोको – क्रिस्टन अॅण्डरसन लोपेझ ,रॉबर्ट लोपेझ

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- गिलेरमो डेल टोरो -द शेप ऑफ वॉटर

सर्वोत्कृष्ट अभिनेता -गॅरी ओल्डमन – डार्केस्ट अवर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – फ्रान्सेस मॅकडॉरमेन्ट – थ्री बिलबोर्डस् आऊटसाईट एब्बिंग, मिसोरी

सर्वोत्कृष्ट सिनेमा- द शेप ऑफ वॉटर

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
पवारांना सतावतेय पाकिस्तानातील मुस्लिमांची चिंता,म्हणाले....
'हिंसक वळण लावणारे, तोडफोड करणारे कार्यकर्ते हे वंचित बहुजन आघाडीचे नाहीत'
...तर भाजप - मनसे एकत्र येऊ शकतात; पाटलांनी दिले युतीचे संकेत
'एमआयएम'ने आजपर्यंत सगळ्यांनाच शिंगावर घेतलयं, मनसेला घाबरत नाही
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
मनसेच्या संघटना बांधणीची जबाबदारी बारामतीकराच्या खांद्यावर
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'
शरद पवार सुरक्षा काढून घेतली ही अफवा,यामध्ये काही तथ्य नाही : अमृता फडणवीस