fbpx

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात सहा जवान शहीद

naxal

दंतेवाडा : दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी भारतीय जवानांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय. या हल्ल्यात ६ जवान शहीद, २ जखमी झाल्याचे वृत्त आहे. नक्षलींकडून आयईडीचा स्फोट करण्यात आला. नक्षलविरोधी अभियानातील सर्वाधिक यशस्वी आणि ऐतिहासिक ऑपरेशन गडचिरोली पोलिसांनी अतिदुर्गम इंद्रावती नदी परिसरात राबविले होते. याचा बदला घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचा अंदाज आहे.

दंतेवाडाच्या छोलनार गावातील ही घटना आहे. अत्यंत तीव्र क्षमतेची स्फोटकं वापरून हा स्फोट घडवण्यात आला. यात गाडीतील सातपैकी पाच जवान जागीच ठार झाले, तर दोन जवान जखमी झाले. जखमींना तातडीनं उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान एका जवानाचा मृत्यू झाला. एकावर अजूनही उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

माहिती मिळताच सीआरपीएफने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केलं. शहीद झालेल्या जवानांमध्ये छत्तीसगड सशस्त्र बलाच्या आणि जिल्हा पोलीस दलाच्या जवानांचा समावेश आहे. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात गेल्या काही दिवसांपासून पोलीस आणि सीआरपीएफकडून संयुक्त सर्च ऑपरेशन चालू आहे. याचदरम्यान नक्षलवादी जवानांवर हल्ला करत आहेत.

1 Comment

Click here to post a comment