fbpx

मुख्यमंत्र्यांच पाणी कनेक्शन तोडा म्हणजे त्यांना पारोसे आल्यावर कळेल : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा :  मुंबई महापालिकेने लाखोंची नळपट्टी थकल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बंगला ‘वर्षा’ डिफॉल्टर म्हणून घोषित केला आहे. जवळपास ७ लाखांचे पाणी बिल थकवल्याने मुंबई मनपाने ही कारवाई केली. यावर अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

पाणी बिलाच्या थकबाकीवर पवार यांनी बोलताना कोणाचीही पाणीपट्टी राहिली तर लगेच पाणी पुरवठा तोडला जातो. पाणी बीले भरली न गेल्यामुळे कमीपणा येतो. हे गंभीर आहे. यांचे  पाणी कनेक्शन तोडा म्हणजे यांना पारोसे आल्यावर कळेल . असं अजित पवार म्हणाले. यावर उत्तर देताना भरलेली बिलं पुन्हा आल्यामुळे हे असं झालं, काळजी करू नका आम्ही पारोसे येणार नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, सोमवारी जितेंद्र आव्हाड यांनी ‘मुख्यमंत्र्यांच्या घरी देश विदेशातून पाहुणे येत असतात. त्यामुळे हे पाहुणे आल्यावर पाण्याची कपात होऊ नये. तसेच मुख्यमंत्री नेहमी व्यस्त असतात, त्यामुळे पाणी कपात होऊन आंघोळीला आणि तोंड धुवायला उशीर होऊ नये म्हणून मी बिल भरायला तयार आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांची फिरकी घेतली होती.