ब्रेक द चेन! लॉकडाऊन विरोधात व्यापारी आक्रमक, पोलिसांना घातला घेराव

उस्मानाबाद: राज्यासह जिल्ह्यात कोरोना पादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे, लॉकडाऊन, अंशतः लॉकडाऊनसारखे प्रयोग सध्या जिल्ह्यात सुरु आहेत. या प्रयोगाचे बळी सामान्य माणूस होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात आता पुन्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. उमरगा शहरातील व्यापाऱ्यांनी मंगळवारी दुकाने सुरू ठेवली होती.

दुकाने बंद करण्यासाठी बाजारपेठेत पोलीस आल्यानंतर दुकाने बंद करुन त्यांना घेराओ घालून आंदोलन केले. यानंतर व्यापाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी व आ. ज्ञानराज चौगुले यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी मंगळवारपासून अंशत: लॉकडाऊन जाहीर केले आहे. हा निर्णय व्यापाऱ्यांच्या मुळावर असल्याने सर्व बाजारपेठ सुरू ठेवण्यात आली. दरम्यान पोलीस प्रशासनाने दुकाने बंद करण्याचे आवाहन केले असता व्यापाऱ्यांनी पोलिसांना घेराओ घातला.

मुळात लॉकडाऊन हा पर्याय नसून अधिक, चाचणी योग्य उपचार सारख्या उपाय योजना केल्यानेच रुग्ण संख्या कमी होईल, तर मग हे लॉकडाऊन लावून प्रशासन आपल्या चुका लपवण्याचा प्रयत्न करीत आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. जर येणाऱ्या दिवसात असेच लॉकडाऊन राहिले तर व्यापारी देशोधडीला लागतील हे मात्र नक्की!

महत्वाच्या बातम्या