लढवय्या नेत्याची एक्झिट : माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे निधन

bhai-vaidya_

पुणे- जेष्ठ समाजवादी नेते माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे दु:खद निधन झाले आहे. भाई वैद्य हे मागील काही काळापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाचा सामना करत होते. पुण्यातील पुना हॉस्पिटलमध्ये मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. वयाच्या ८९ वर्षी त्यांनी अखेरचा स्वास घेतला. भाई वैद्य यांच्या जाण्याने समाजकारण आणि राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या मागे  मुलगा सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व राष्ट्र सेवा दलाचे पुर्व कार्यकारी विश्वस्त डॉ.अभिजीत वैद्य, सुन डॉ.प्रा.गीतांजली वैद्य, मुलगी प्रा. प्राची रावल, जावई प्रताप रावल, नातवंड सोहिल, डॉ.सलिना व प्रशिला असा परिवार आहे.

जेष्ठ समाजवादी विचारवंत मा.भाई वैद्य (भालचंद्र सदाशिव वैद्य) यांचा परिचय 
जन्म – २२ जून १९२७ मूळगाव – दापोडे, ता.वेल्हा जि.पुणे
अध्यक्ष, एस.एम.जोशी मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट, पुणे. (१९९८पासून)
अध्यक्ष, पुणे म.न.पा.सेवा निवृत्त संघ. (१९९५ पासून)

Loading...

पुर्वी कार्य केलेली पदे.
राष्ट्रीय अध्यक्ष, सोशलिस्ट पार्टी (इंडिया) ( मे २०११ ते २०१६.)
राष्ट्रीय अध्यक्ष, भारत यात्रा ट्रस्ट, दिल्ली. (२००४ ते २०११)
राष्ट्रीय महामंत्री, जनता पार्टी. (१९८६ ते १९८८ )
राष्ट्रीय महामंत्री, समाजवादी जनपरिषद. (१९९५ ते १९९९)
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल. (२००० ते २००२)
महापौर, पुणे (१९७४ ते १९७५)
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया मेयर्स कोंन्फरन्स (१९७५)
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा.(२००४ ते २०१३)
अध्यक्ष, खडकी अम्युनिशन फॅक्टरी वर्कर्स यूनियन,पुणे. २०१३ पर्यन्त.
महाराष्ट्र राज्याचे गृह आणि सर्वसाधारण प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री. (१९७८ ते १९८०)
या कार्यकाळात पहिले मराठवाडा नामांतर विधेयक विधानसभेत मांडले.
स्मगलरचे सात साथीदार तीन लाख रुपये लाच घेऊन आले असताना गृहराज्य मंत्री म्हणून त्यांना पोलिसांच्या हवाली करून तुरुंगात पाठविले.
महाराष्ट्र राज्य पोलिसांना फूल पॅंट देण्याचा ऐतिहासिक निर्णय.
महाराष्ट्र सेवा निवृतांच्या वेतनामध्ये किमान निवृती वेतन आणि त्याची महागाईशी जोडणी या गोष्टी करून घेतल्या.

अनेक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग व तुरुंगवास

१९४२ साली शालेय जीवनात चलेजाव चळवळीमध्ये सहभाग.
१९५५ मध्ये गोवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये तुकडीत सहभाग
१९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग व तुरुंगवास.
१९६१ साली कच्छ सत्याग्रहामध्ये भुज ते खावडा पदयात्रेत सहभाग.
१९७४ ते १९७७ या दरम्यान आणीबाणीमध्ये मिसाबंदी म्हणून १९ महीने तुरुंगवास.
१९८३ मध्ये जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यान निघालेल्या भारत यात्रा मध्ये ४००० किलोमीटर अंतराच्या यात्रेत सक्रिय सहभाग.
आत्ता पर्यन्त सुमारे २५ वेळा सत्याग्रह व तुरुंगवास. शेवटचा सत्याग्रह व अटक डिसेंबर २०१६ मध्ये ८८व्या वर्षी शिक्षण हक्कासाठी.
१९४३ साली राष्ट्र सेवा दलात सामिल झाल्यापासून ‘लोकशाही समाजवादी’ विचारधारा स्विकारली आणि आजतागायत ती निष्ठेने जपली.
१९४६ साली कोंग्रेस सोशलिस्ट पार्टी या जयप्रकाश नारायण, डॉ.लोहिया व एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे प्रथम सदस्यत्व. त्यानंतर समाजवादी पक्षाची जी जी रूपांतरे झाली त्यात सक्रिय सहभाग.
विचारधारे संबंधी आयुष्यभर लेखन, प्रबोधन, संघर्ष व संघटन. एका समाजवाद्याचे चिंतन, मंडल आयोग व अन्य मागासवर्ग, समाजवाद, संपूर्ण शिक्षण: फी विना समान व गुणवत्तापूर्ण :का व कसे, आर्थिक आक्रमणाचे आरिष्ट (भाषांतरीत), परिवर्तनाचे साथी व सारथी, शब्दामागचे शब्द आदी पुस्तके प्रकाशित.
आजवर प्रतिष्ठेचे २५ पुरस्कार प्राप्त. : राजर्षि शाहू जीवन गौरव पुरस्कार, पुणे विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार व इतर.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठी बातमी : महाविकास आघाडीचं बिनसलं, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आमने सामने
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी