#BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये, सुशांतच्या चाहत्यांनी ट्वीटरवर खानांच्या विरोधात उघडली मोहीम

khan

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलीवूडमध्ये शीतयुद्ध सुरु झालं आहे. अनेक कलाकारांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूडमधील घराणेशाहीला जबाबदार धरलं आहे. अभिनेत्री कंगना रनौत, दिग्दर्शक अभिनव कश्यप, अभिनेते प्रकाश राज यांनी बॉलिवूडमधील घराणेशाहीची काळी बाजू जगासमोर आणली आहे.

या प्रकरणावरून नेटकऱ्यांनी देखील करण जोहर, एकता कपूर, सलमान खान, संजय लीला भन्साळी यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली आहे. या सर्वांवर टीका होत असतानाच बिहारमधील एक वकिल सुधीर कुमार ओझा यांनी या सर्वांविरोधाततक्रार दाखल केली आहे.

नेटकऱ्यांनी झोडपून काढताच वैतागून करण जोहरने उचलले मोठे पाऊल

या प्रकरणात करण जोहरला मोठ्या प्रमाणावर लक्ष्य केले जात आहे.करणने सुशांतला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली होती. गेल्या वर्षभरापासून मी तुझ्या संपर्कात नव्हतो. या गोष्टीचा मला खेद आहे, अशा आशायाची पोस्ट लिहून करणने सुशांतला श्रद्धांजली दिली होती.मात्र या पोस्टमुळे संतापाची लाट उसळली.

आपल्याला सलमान, संजय दत्त सारखे गुंड आवडतात आणि ख-या टॅलेंट नेहमीच डावलले जाते. बॉलिवूडमध्ये नेपोटिझमला बढावा देणारा करण जोहरच आहे. करण जोहर त्याच्या सिनेमात केवळ स्टार किडसना संधी देतो. प्रतिभावान कलाकरांच्या पदरी नेहमीच निराशा पडते अशा प्रतिक्रीया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाऱ्या सुशांतचा असा होता जीवनप्रवास

अशातच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे. अनेकांनी तर सलमान, शाहरूख आणि आमिर या तिघांनीही बॉलिवूडमधून बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. मात्र काहींनी अद्याप सलमान-शाहरुख यांना पाठिंबा दिला आहे आणि यावरूनच सुशांतचे चाहते आणि सलमान-शाहरुख यांचे चाहते यांच्यात ट्विटर वॉर सुरू आहे. त्यामुळेच आता ट्विटरवर #BoycottKhans टॉप ट्रेंडमध्ये दिसत आहे.