बॉक्सर माईक टायसन पुन्हा एकदा रिंगमध्ये उतरणार

mike tyson

नवी दिल्ली- बॉक्सर माईक टायसन पुन्हा एकदा रिंगणात परतणार आहे. बर्याच दिवसांपासून हेवीवेट चॅम्पियन माईक टायसनला परत येण्याची चर्चा होते आहे. गुरुवारी, अखेर त्याने जाहीर केले की, 12 सप्टेंबरला तो पुन्हा रिंगमध्ये उतरणार आहे.

गुरुवारी, त्याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना सांगितले की, 12 सप्टेंबर रोजी तो चार डिजीवन विश्वविजेत्या रॉय जॉन्सविरुद्ध बाउट मध्ये उतरणार आहे.यापूर्वी माजी प्रतिस्पर्धी एव्हॅन्डर होली फील्ड आणि न्यूझीलंडचा रग्बी खेळाडू सोनी बिल विल्यम यांच्यासोबत स्पर्धेची चढच होती.

वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी हेवीवेट चॅम्पियन म्हणून जेतेपद मिळविणार्या माईकची कारकीर्द वादाने परिपूर्ण होती. सोशल मीडिया अकाउंटमध्ये आपले वर्कआउट व्हिडिओ आणि फोटो शेअर करणाऱ्या माइकने 2003 मध्ये दिवाळखोर असूनही करिअरमध्ये 300 मिलियन डॉलर्सची कमाई केली होती.

महत्वाच्या बातम्या-

‘मदरशांसाठी कोट्यावधींचा निधी तर कोविड योध्याचे वेतन अजूनही थकलेले’

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको – अमित देशमुख

“नगरसेवक हरवले आहेत, आजारात सोडलत आता आम्ही मतदान करताना सोडतो!”

IMP