बॉक्सर जितेंद्र मानची गोळ्या घालून हत्या

टीम महाराष्ट्र देशा- हरयाणा स्टेट बॉक्सिंग असोसिएशनचा सदस्य असलेला राष्ट्रीय स्तरावरील माजी खेळाडू जितेंद्र मान याची राहत्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. जितेंद्र मान (वय २७) हो ग्रेटर नोयडात जीम ट्रेनर म्हणून काम करीत होता. त्याचा माजी रुममेट प्रितम सिंग याने त्याच्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पाहिले त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली. जितेंद्रची दोन गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

जितेंद्रच्या कुटुंबियांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मात्र, तक्रारीत त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही. आयपीसी सेक्शन ३०२ अंतर्गत याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर सुरजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतमबुद्ध नगर जिल्ह्याचे उपअधिक्षक अमित श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.घटनास्थळी सीसीटीव्ही बसवलेले नसल्याने मारेकऱ्यांना शोधण्यात अडचणी येत आहेत. मात्र, शवविच्छेदनाचा अहवाल आणि जितेंद्रच्या फोन कॉल्सची माहिती यावरुन त्याच्या मृत्यूचे कारण आणि आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...