या दोन्ही राजकारण्यांनी एकमेकांवर केले आहेत जोरदार राजकीय प्रहार

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे शरद पवार यांची अभूतपूर्व मुलाखत घेत आहेत. यापूर्वी या दोन्ही राजकारण्यांनी एकमेकांवर जोरदार राजकीय प्रहार केले आहेत. आपल्या ५० वर्षाच्या राजकारणात एकदाही निवडणुकीत न हारणारे शरद पवार आणि आपल्या तीक्ष्ण शब्दांनी भाषणातून वार करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची चांगलीच जुगलबंदी आज पुण्यात रंगणार आहे.

शरद पवार आणि राज ठाकरे कुटुंबीयांचे जुने संबंध आहेत. राजकीय जरी हे विरोधक असले तरी मनसेच्या निर्मितीपासून राज ठाकरेंनी पवारांवर वेळोवेळी टीका केली आहे. मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया देताना राज यांनी पवारांच्या राजकारणाचा गलिच्छ असा उल्लेख केला होता. तसेच पवारांनी तर अनेकदा राज ठाकरेंच्या टीकेला पोरकट समजले आहे. पवारांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी पवारांवर स्तुतिसुमनं उधळली होती. टीका करायचं हे व्यासपीठ नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.