सासऱ्याला मारहाण करणाऱ्या जावयासह दोघे गजाआड 

Robbed by beating a finance employee; Daytime events in Palam

औरंंगाबाद : पतीच्या मारहाणीत बेशुदध्द पडलेल्या मुलीला रुग्णालयात नेण्यासाठी आलेल्या पित्याला जावायसह इतर नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना २४ जानेवारी घडली होती. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी जावई शेख नईम शेख इब्राहिम (वय ३५), सासरा शेख इब्राहिम शेख जाफर (वय ६०) आणि शेख मतीन शेख इब्राहिम (वय ३२, सर्व रा. शरीफ कॉलनी) या तिघांना अटक केली आहे.

मुलशेर खान बुढण खान (वय ७०, रा. फरहत नगर, जटवाडा रोड) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, २६ जून २००६ रोजी फिर्यादीच्या मुलीचे लग्न शेख नईम याच्याशी झाले होते. त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. लग्नानंतर आरोपी फिर्यादीच्या मुलीला वांरवार मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास देत होते. २४ जानेवारी रोजी फिर्यादीच्या मुलगी राहत असलेल्या घराच्या मालकाने फोन करुन फिर्यादी यांना मुलीला मारहाण होत असल्याचे सांगितले.

त्यामुळे फिर्यादी मुलीच्या घरी धाव घेतली असता, मुलगी बेशुध्द अवस्थेत पडलेली दिसली. तिला रुग्णालयात नेत असतांना शेख नईम, शेख इब्राहिम, शेख मतीन आणि नसीम बेगम यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तर शखे इब्राहीम याने फिर्यादीला लाखंडी वस्तू मारहाण करुन जखमी केले. प्रकरणात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हादाखल करण्यात आला.

महत्वाच्या बातम्या