सेना-भाजपला रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेस एकत्र

सुनील तटकरे

टीम महाराष्ट्र देशा- विधान परिषदेतील जवळपास २१ जागा तीन महिन्यांत रिक्त होत आहेत. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणारे आमदार, पदवीधर मतदारसंघातून निवडून येणारे आमदार अशा विविध जागांचा समावेश आहे. या जागांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी एकमेकांविरोधात न लढता आघाडी करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. भाजपा सरकारला या विधान परिषद निवडणुकीत यशापासून रोखण्यासाठी दोन्ही कॉंग्रेसने आघाडी केली पाहिजे, यावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे एकमत झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सध्या ज्या पक्षाकडे जी जागा आहे तीच कायम ठेवायची की आपसात बदलायची, भाजपा-शिवसेनेकडे असलेल्या जागांवर कोणी लढायचे अशा विविध मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी व आघाडीची बोलणी करण्यासाठी बैठका सुरू ठेवण्याचेही यावेळी ठरले.