आरटीआय कार्यकर्ते विनायक शिरसाट यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक

टीम महाराष्ट्र देशा – माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचे अपहरण करुन त्यांची हत्या करुन मुळशी तालुक्यातील पिरंगुट ते लवासा दरम्यान त्यांचा मृतदेह दरीत टाकून दिल्याचे उघड झाले आहे.

Loading...

आता या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. त्यामध्ये मुक्तार अली आणि फारुख खान अशी या दोन आरोपींची नावं आहेत. विनायक शिरसाट यांचं अपहरण आणि हत्या अशा गुन्ह्याखाली या दोघांना अटक करण्यात आली आहे. मात्र, हत्येचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे.

विनायक शिरसाट यांचा मृतदेह दरीत संशयास्पदरित्या आढळून आला आहे. त्यांच्या मृत्यूने शिवणे येथे एकच खळबळ उडाली आहे.

विनायक शिरसाट हे शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते होते. त्यांची हत्या झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. शिरसाट हे गेल्या आठ दिवसांपासून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता होते.

विनायक शिरसाट यांचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांचे भाऊ किशोर शिरसाट यांनी आठ दिवसापूर्वी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात केली होती.

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...