fbpx

‘राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत तोपर्यंत उधारी बंद’; उधारी रोखण्यासाठी सलूनवाल्याची आयडिया

माढा : उधारीवर दाढी-कटिंग करणाऱ्या गिऱ्हाईकांपासून सुटका करून घेण्यासाठी पंढरपूरमधील एका सलूनवाल्याने अनोखा फंडा वापरला आहे. जोपर्यंत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान होत नाहीत, तोपर्यंत उधारी बंद ठेवण्यात येत असल्याचं या सलूनवाल्याने गिऱ्हाईकांना सांगितलं आहे.

माढा शहरातील सचिन जेन्टस पार्लरमध्ये मालकाने ‘राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत उधारी बंद’ अशी पाटी लावली आहे. या पाटीमुळे अनेक लोक कुतुहलापोटी या दुकानात गर्दी करत आहेत. तसेच लोकांनी सलूनवाल्याला दाढी केल्यानंतर, केस कापल्यानंतर रोख पैसे देणे सुरु केले आहे.

दरम्यान, या पाटीमुळे ६० टक्के उधारी बंद झाल्याचंही त्याने सांगितलं. सध्या नोटाबंदीमुळे बाजारात पैसे नाहीत. राहुल जेव्हा पंतप्रधान होतील, तेव्हा बाजारात पुन्हा पैसा येईल. त्यानंतर उधारी सुरू करण्याचे आश्वासनही त्याने ग्राहकांना दिलं आहे.