कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दी आजपासून सील 

मुंबई : देशभरात कोरोना बाधितांची संख्या ४ हजार ४२१ वर पोचली असून कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ११४ झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं आज ही माहिती दिली. उपचारानंतर ३२५ रुग्ण यातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं आहे.

राज्यात, आणखी २३कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून आता राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ८९२ झाली आहे. नवीन २३ रूग्णांमध्ये १० रूग्ण मुंबईत आढळले असून पुणे शहरात ४, अहमदनर -३, बुलडाणा आणि नागपूर इथं प्रत्येकी २, तर सांगली आणि ठाण्यात प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत ५२ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यृ झाला आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोना रूग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता प्रशासनानं काल मध्यरात्रीपासून कल्याण आणि डोंबिवलीच्या सीमा अत्यावश्यक सेवा वगळता इतरांसाठी प्रतिबंधीत केल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दी कोविड १९ चा प्रादुर्भाव तपासण्याकरता आजपासून सील करण्यात आल्या आहेत. मात्र जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे निर्बंध नसतील असं आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.