fbpx

वाघा बोर्डरवर BSFची खेळी; भारताने उधळला पाकिस्तानचा डाव

नवी दिल्ली– भारताचा विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हा पाकिस्तानच्या ताब्यात असून आज अभिनंदन हा मायदेशी परतणार आहे.अभिनंदान हा अटारी बोर्डर वरून भारतात परतणार आहे. अभिनंदनच्या स्वागतासाठी अटारी बोर्डरवर सामान्य नागरिकांनी तुडुंब गर्दी केली आहे तर आता आलेल्या माहिती नुसार थोड्याच वेळात अभिनंदन हा भारताच्या भूमीवर परतणार आहे.

मात्र अभिनंदन यांची सुटका करताना पाकिस्तान स्वत:ची प्रतिमा शांतीदूत असल्याचे जगाला भासवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच आज अटारी-वाघा बॉर्डरवर वरून बिटींग-द-रिट्रीट कार्यक्रमावेळीच अभिनंदन यांना सोडण्याचा पाकिस्तानचा डाव होता. मात्र हिंदुस्थानने आजचा बिटींग-द-रिट्रीट कार्यक्रम रद्द केला आहे. त्यामुळे पाकिस्तानला हवी तशी प्रसिद्धी मिळणार नाही, त्यामुळे त्यांचा डाव उधळून लावण्यात हिंदुस्थानला यश मिळाले आहे.

अटारी बोर्डरवर अभिनंदन चे आई वडील देखील उपस्थित आहेत. तर अटारी बोर्डर वर होणारा बिटिंग रिट्रीट सेरेमनी देखील रद्द करण्यात आला आहे.