सिनसिनाटी ओपन : बोपण्णा-डॉडीग जोडीची उपांत्यपूर्व फेरीत धडक

सिनसिनाटी : सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत सातव्या मानांकित भारताच्या रोहन बोपण्णा आणि क्रोएशियाच्या इवॅन डॉडीग जोडीने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या जोडीने कोलंबियाचा जुआन सेबॅस्टन कॅबल आणि इटलीचा फॅबीयो फॉगनीनी या जोडीवर ५-७, ७-५, १०-५ अशा विजय मिळवला. सुरूवातीचा सेट कॅबल-फॉगनीनी जोडीने जिंकला होता. पण दुस-या सेटमध्ये बोपण्णा-डॉडीग जोडीने दमदार पुनरागमन केले. तिसरा सेटही अटीतटीचा होर्इल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती, पण बोपण्णा-डॉडीग जोडीने तो सेट सहजपणे जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. उपांत्यपूर्व फेरीत त्यांची लढत द्वितीय मानांकित ब्राझीलचा मार्सेलो मेलो आणि पोलंडचा लुकाझ कुबोट या जोडीशी होणार आहे.