बोनी कपूरलाही मिळाला गोल्डन व्हीसा; सोशल मीडियावरुन दिली माहिती

bonny

मुंबई : परदेशात जाण्याचे प्रत्यकांचे स्वप्न असते. सर्वसामान्यांपेक्षा सेलिब्रिटींना दुबई सारख्या ठिकाणी जाणे सहज शक्य होते. नुकतेच बॉलीवूडमधील दिग्गज आणि गाजलेल्या कुटूंबियांपैकी एक म्हणजे कपूर कुटुंबिय. चित्रपट निर्माते बोनी कपूर यांना देखील स्वप्नातल्या दुबईमध्ये पाऊल ठेवण्याची संधी मिळाली आहे.

बोनी कपूर यांनी त्यांच्यासह कुटूंबियांना गोल्डन व्हीसा मिळाला असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. कपूर कुटूंबियांना तब्बल १० वर्षांसाठी हा व्हीसा मिळाला आहे. बोनी यांनी नुकतेच ट्वीट करत याची माहिती दिली. या ट्वीटमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, मला आणि माझ्या परिवाराला दहा वर्षांसाठी गोल्डन व्हीसा दिल्याबद्दल दुबई सरकारला धन्यवाद ‘दुबईचा गोल्डन व्हीसा मिळाल्याने कपूर कुटूंबिय आनंदी आहेत. त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी विविध इमुजीच्या माध्यमाने त्यांच्या आनंदात सहभागी असल्याचं सांगत आहेत.

तसेच पाहता दुबईमध्ये गोल्डन वीजाबद्दल पहिल्यांदा २०१९ मध्ये जाहीर करण्यात आले. युएईचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष तसेच शासक मोहम्मद बिन रशीद शेख अल मकतूम यांनी ही योजना आणली. बॉलीवूडमधील कलाकारांमध्ये हा व्हीसा प्रथम संजय दत्तला मिळाला. दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार मोहनलाल आणि ममूटीने गोल्डन व्हीसा मिळाल्याची माहिती चाहत्यांना नुकतीच शेअर केली होती. तसेच शहारूख खान, संजय दत्त, सुनील शेट्टी, आणि टोविनो थॉमस अशा कलाकारांना दुबईन गोल्डन व्हीसा दिलेला आहे.

महत्वाच्या बातम्या