भावूक वातावरणात वाजपेयींच्या अस्थींचे विसर्जन

टीम महाराष्ट्र देशा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थींचे आज विसर्जन करण्यात आले. हरिद्वार मधील हर की पौरी येथून गंगा नदीमध्ये अस्थी विसर्जित करण्यात आल्या. देशभरातील १०० नद्यांमध्ये अस्थी सोडण्यात येणार आहे. अस्थी विसर्जनासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते.

कलश यात्रेत भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. हरिद्वार येथील हर-की-पौडी येथे अस्थी विसर्जन करण्यात आले. या ठिकाणी एक व्यासपीठ उभारण्यात आले होते. यावेळी विधी पार पाडल्यानंतर वाजपेयींच्या मानसकन्या नमिता यांनी वाजपेयींच्या अस्थी गंगा नदीत विसर्जित केल्या. यावेळी वातावरण अतिशय भावूक झाले होते.

कवी मनाच्या अटलजींच मराठी प्रेम