मिलिंद एकबोटेंची याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार!

पुढील सुनावणी ६ फेब्रुवारीला

मुंबई: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीमध्ये संशयित आरोपी मिलिंद एकबोटेची याचिका ऐकण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. माझ्यावर चुकीचे आरोप लावले असल्याचा दावा मिलिंद एकबोटेंनी केला आहे. गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका मिलिंद एकबोटेंनी मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे.

Rohan Deshmukh

न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला यांच्या खंडपीठानं मात्र यावर सुनावणी घेण्यास नकार देत, दुस-या खंडपीठापुढे जाण्याचे आदेश एकबोटे यांना दिले आहेत. त्यामुळे एकबोटे यांना आता दुस-या खंडपीठापुढे आपली याचिका सादर करावी लागणार आहे.

कोरेगाव भीमा येथे शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या लोकांवर दगडफेकीचा प्रकार घडला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरूजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्याविरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  या प्रकरणाची सुनावणी ६ फेब्रुवारीला होणारआहे.

Latur Advt
You might also like
Comments
Loading...