fbpx

ब्रेकिंग : तूर्तास तरी मराठा आरक्षण टिकलं ; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगिती देण्यास नकार

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात 2014 मध्ये दाखल मुख्य याचिकांसोबत या याचिकेवरही येत्या 10 डिसेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायाधीश नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात धाव घेणाऱ्या जयश्री पाटील यांचे वकील अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणवर तातडीने सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर मात्र दुपारी 3 वाजेपर्यंत वकिलासह याचिका सादर करण्याची परवानगी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिली होती. त्यानुसार आज दुपारी तीन वाजता पुन्हा याचिका दाखल झाल्याने सुनावणी झाली. त्यावरील सुनावणी करताना हायकोर्टाने स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे.

मराठा आरक्षण कायद्याविरोधात याचिका मराठा आरक्षण कायद्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारने 50 टक्क्यांच्या वर आरक्षण जाहीर करणं हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे. तसंच एखाद्या समाजाला 16 टक्के आरक्षण देणं हे संविधानाच्या तरतुदींविरोधात असल्याचं सांगत, अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका सादर केली. यामुळे सरकारला मराठा आरक्षणासाठी न्यायालयात लढाई लढावी लागणार आहे.