fbpx

तारीख पे तारीख नाही, प्रलंबित खटल्यांसाठी कोर्टाचे कामकाज चालले पहाटेपर्यंत 

मुंबई: भारतामध्ये वाढणाऱ्या प्रलंबित खटल्यांमुळे न्याय मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रार कायम केली जाते. त्यामुळे ‘कोर्टाचे काम आणि दहा महिने थांब’ अशा प्रकरच्या उपरोधिक म्हणी देखील बोलल्या जातात. मात्र, या सर्व गोष्टींना फाटा देणारी घटना काल मुंबई हायकोर्टमध्ये घडली आहे.

झाल अस कि, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होण्यापुर्वीचा मुंबई हायकोर्टाचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी  न्यायमूर्ती शाहरुख कथावाला यांनी पहाटे साडे तीन वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज सुरु ठेवले, अनेक खटल्यांवर यावेळी आदेशही देण्यात आले आहेत.

न्यायमूर्ती शाहरुख यांनी वेळेच्या चौकटीतून चालणाऱ्या कामकाजाला फाटा देत पहाटेपर्यंत कामकाज केल्याने सध्या सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

1 Comment

Click here to post a comment