नालासोपारा बॉम्ब साठा प्रकरण; चार संशयितांची सुटका

पालघर :  नालासोपारा बॉम्ब साठा प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली होती. दरम्यान त्यापैकी 4 जणांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. विशाल खुंटवाल, महेश इंदलकर,प्रसाद देशपांडे आणि अवधूत पैठणकर अशी या चार संशयितांची नावे आहे.

दरम्यान,शुक्रवारी नालासोपारा परिसरातील वैभव राऊत यांच्या घरी एटीएसनं मारलेल्या छाप्यामध्ये मोठा बॉम्ब साठा आढळून आला होता. याप्रकरणी वैभव राऊतसह शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मुंबई आणि पुण्यामधून १२ जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी ४ जणांची सुटका करण्यात आली आहे.

या सर्वांची कसून चौकशी केली जात असून नेमके या संपूर्ण कटाचे लक्ष्य कोण होते याचा तपास एटीएसद्वारे केला जात आहे. तसंच यापूर्वी डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, डॉ.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांशी या आरोपींचा काही संबंध आहे का, या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरु आहे.

संशय घेत बदनामी करण्याचा ‘भाजप पॅटर्न’ थांबवा-आप

1 Comment

Click here to post a comment